यालाच ‘जीवन’ म्हणतात…….

विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखाली बसावं,
समोरचं एक विंचू दिसावा..
त्याला मारण्यासाठी दगड उचलावा,
दगडाखालून साप निघावा..
त्याने आपला पाठलाग करावा,
पळताना ठेच लागून विहीरीत पडावं..
विहीरीत मोठी मगर असावी,
तिने वेग घेण्यापूर्वी,
एखाद्या फांदीचा वेध घ्यावा..
वर येण्याचा प्रयत्न करावा,
वरती भूकेला वाघ असावा..
त्याच्या भितीने फांदीचा हात सुटावा,
फांदीवरील मधमाशांनी भडका करावा..
आणि…
अशा अवस्थेत
मधाच्या पोळीतून पडणारा,
मधाचा एक थेंब
तोंडाने झेलण्याचा प्रयत्न करावा..
यालाच ‘जीवन’ म्हणतात…….
.
बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोपे असत..!!
जगायला गेलं तर दु:खातही सुख असत..!!
चालायला गेलं तर
निखारेही फूले होतात..!!
तोंड देता आले तर
संकटही शुल्लक असत..!!
वाटायला गेलं तर
अश्रूंतही समाधान असत..!!
पचवायला गेलं तर
अपयशही सोपे असत…!!
हसायला गेल तर
रडणेही आपल असत …..!!
बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोपे असत….

नाती जपण्यात मजा आहे..
बंध आयुष्यचे विणण्यात मजा आहे..
जुळलेले सूर गाण्यात मजा आहे..
येताना एकटे असलो तरी,
सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे..

नशीब कोणी दुसरं लिहित नसतं
आपल नशीब आपल्याच हाती असतं..
येताना काही आणायचं नसतं
जाताना काही न्यायचं नसतं..
मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं या प्रश्नाचे उत्तर
शोधण्यासाठी जन्मायचं असतं…

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s