जिद्द असावी तर कशी… फेसबुकच्या नव्या डायरेक्टरसारखी

नोकरी मिळाली नाही तर बनला `फेसबुक`चा डायरेक्टर!

जिद्द असावी तर कशी… फेसबुकच्या नव्या डायरेक्टरसारखी… असं म्हटलं तर आता वावगं ठरणार नाही. होय, कारण नुकतंच फेसबुकच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये एन्ट्री मिळवणाऱ्या जन कूम यांना एकेकाळी याच फेसबुकनं नोकरी देण्यासही नकार दिला होता.

व्हॉटसअपचे सीईओ जन कूम आणि त्यांचा सहकारी ब्रायन एक्टन यांना काही वर्षांपूर्वी फेसबुकनं नोकरी देण्यासही नकार दिला होता. परंतु, याच कूम यांना फेसबुकनं आता आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या यादीत सहभागी करून घेतलंय. फेसबुकशी केलेल्या या करारानुसार जन कूम हे जवळपास ४२,१६० करोड रुपयांच्या संपत्तीचे एकटे मालक बनणार आहेत.

फेसबुक आता वॉट्स ऍप विकत घेणारेय…१६ बिलियन डॉलर्सला फेसबुक वॉट्स ऍप खरेदी करण्याचा व्यवहार करणार आहे. तब्बल चार बिलियन डॉलर्स रोख रक्कम आणि १२ बिलियन डॉलर स्टॉक्सच्या स्वरुपात विकत घेण्याचा हा व्यवहार झालाय. पण, फेसबुकनं हा निर्णय का घेतला असा प्रश्न अनेकांना पडलाय….

मॅसेजिंग सुविधा देणारं अॅप्लिकेशन व्हॉटस्अपमुळे लोक आपल्या मित्रांसोबत मनमुराद गप्पा मारू शकतात. यासाठी तुमच्याजवळ हवाय केवळ तुमच्या मित्राचा मोबाईल नंबर… त्यामुळेच तरुण-तरुणींमध्ये व्हॉटसअपची थोड्याच वेळात मोठी क्रेझ निर्माण झाली होती. यादरम्यान फेसबुकचे सीएपओ डेव्हिड एबर्समॅन यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कंपनीच्या टीनेज मार्केट सेगमेंटमध्ये घसरण झाल्याचं निदर्शनात आणून दिलं होतं. यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये थोडी खळबळ उडाली. फेसबुकच्या तुलनेत व्हॉटसअपवर तरुण-तरुणींचा ओढा वाढत होता. त्यामुळे फेसबुकनं आपलं भविष्य सुरक्षित करण्यासाठी हा सौदा केल्याचं म्हटलं जातंय

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s